“तू सदा जवळी रहा….” भाग – ७ अर्थात : मुंबई एक वेगळी संस्कृती

” तु सदा जवळी रहा…. “.
भाग -1. एक आईं , बायको, आणि नोकरी करणारी आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते …….

भाग -2. बाल मैत्रीण, ज्योतीची भेट, पती राजेशचे प्रताप , आईं विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण , …

भाग -3. शाळा – कॉलेज , मोकळेपणाने वागण्याचा परिणाम, कठीण प्रसंग आणि मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट …

भाग – 4. विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई …
अनुभूती घेतलीत कुसुम ताईच्या व्यक्तिमत्वाची आणि रममाण झालात सई, चंदाच्या बालपणात

भाग -5. मध्ये आपण अनुभवलेत रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात, आईची परीक्षा सुरु. ….. पाचवा भाग संपताना प्रश्न नव्हते निशब्द शांतता होती. प्रार्थना बळ देते रश्मीला आणि कुटुंबियांना… 🙏.

भाग – 6. मध्ये रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी, आणि रश्मीच वि….. सदृश्य जीवन.

भाग -7. मध्ये वाचा अमूल्य शिक्षण, भात आणि लहान सई, राजेशची पार्श्वभूमी, मानस पूजा,

अमूल्य शिक्षण📖🖍️🖌️📚✒️🖋️

शाळा, कॉलेजमध्ये असताना रश्मी साठी आलेल्या विवाह स्थळांना नकार देऊन जिद्दीने पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून घेतलं विनितानं. रश्मी पाठोपाठ चंदा आणि सईची पण शिक्षणा बद्दलची गोडी ठाम होती. अर्धवट शिक्षणामुळे आपण ज्या अवस्थेला तोंड देतोय ती वेळ आपल्या मुलींवर येऊ नये. अशिक्षित असण्याचे भोग किंवा अर्धवट शिक्षणा मुळे कुटुंब उध्वस्त होताना पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या विनीता आई इतकं शिक्षणाचे महत्व कोण जाणू शकलं असतं ? प्रश्नच उद्भवत नव्हता रश्मीचे लवकर लग्न करण्याचा. विनिता आपल्या मुलींना सर्व गोष्टी स्पष्ट करून सांगत असे. विनिता आईचा उद्देश्य स्पष्ट आणि हेतू निस्वार्थी होता. विनिताने फक्त साक्षर नाही तर सुशिक्षित बनवलं तिघी मुलीनां.

कमी खस्ता नाही खाल्या विनिताने त्यासाठी. स्वतः तरुण असूनसुद्धा कधी स्वत:चा विचार केला नाही. कधी भूतकाळात रमली नाही. एकच ध्येय. मुलींचं शिक्षण आणि स्वावलंबन. चौघी कधी पावसानं भिजल्या🙏💧🌦️🌦️ , उन्हात भाजल्या☀️⚡, थंडीनं कुडल्या. आपल्या माणसांनी परकेपणा दिला. परक्यानी माणुसकी दाखवली. कोण आपलं ? कोण परकं? कोण जोडलेलं? कोण रक्ताचं? गणितं बदलली बरीच. शेतीवर अलंबून असणं म्हणजे नेमके काय असते ❓️ हे दिसून आलं. आर्थिक गणितं जुळवताना रश्मीच्या आईनं शिक्षणासाठी कधीच तडजोड केली नाही. बऱ्याच वेळेस, मारुती नाईक यांच्याकडून शाळा सुरु झाली की पुस्तक – वाह्यासाठी📖📚✒️🖍️ दामदुप्पट व्याजदरांनं पैसे घ्यावे लागले तिला. मग धान्य किंवा तंबाखु विकून आलेले पैसे घरी नं येता कित्येकदा आई आणि रश्मी स्वतः नाईक काकांना देऊन आल्या होत्या. पण तिनं आपल्या मुलींना असं कधीच जाणवू दिलं नाही की ती मजबूर आहे. रश्मी पाहत आणि समजत गेली. व्याजदरांनं घेतलेलं कर्ज फेडायला रश्मी स्वतः आईबरोबर जाताना विनिताआईच्या चेहऱ्यावरचा ताण कमी झालेला भासे रश्मीला.

भात आणि लहान सई

      "मावशी, तु देविशाला जबरदस्तीनं भात का भरवतेस? तिचं पोट भरलय. एकच घास तर राहिलाय भाताचा. नको भरवू तिला." नेहा जेव्हा जोरात बोलली तेव्हा नकळत रश्मी भूतकाळात गेली. दोनच वर्षांची होती सई. विनिताने नुकतेच सईला भात, वरण,

पोळी भरवायला सुरुवात केलेली होती. आबांच्या जाण्याने काय नुकसान झालं ते कळत नव्हत रश्मीला❓️ पण अमूल पावडरचे दूध बनवून दिलं जायचं सईला. ताईआजी जेव्हा - जेव्हा पावडरच दूध बनवायची तेव्हा, तेव्हा रश्मीच्या आईचे आणि ताई आजीचे डोळे पाणावलेले पाहिले रश्मीने. "सईला मऊ भात भरव,विनी," ताईआजी मधेच म्हणायची. "नवीन तांदळाचा भात मऊ होईल. आता काळजी मिटली." खळ्यांमध्ये भाताची रास बघून सारेच आनंदले! पाऊस, पाणी चांगले झाल्यामुळे सर्वच पीकं भरभरून आली होती. खळ्यात धान्य मावत नव्हते. पण आनंद फार काळ टिकला नाही. दूरच्या काकांनी सर्व धान्य, खळ्यातून उचलून नेलं. रश्मी, चंदाला काहीच कळलं नाही. विनिता आई 😞🤐निशब्द होती. ताई आजीचा आवाज पोहोचलाच नाही तिथपर्यंत. रश्मीने खळ्यांमध्ये राहिलेली भाताची बोण्ड एकत्र करून घरी आणली आणि ताई आजीला म्हणाली, "ताई, याचा भात तयार कर. आपण सईला देऊ. तू,शिजव ना भात". भात बनवायच्या ऐवजी ताईआजी रश्मीला जवळ घेऊन मुसमुसून रडत होती. “………….

“आणि इथं देविशाला भात जास्त झाला म्हणून ती टाकून देते अन्न,” नेहाची रश्मी मावशी पुटपुटली.
नेहाला समजलं नाही, एक घास अन्न वाया गेलं म्हणून मावशीचा आवाज कातर का झाला?
सतरा पोती भात पिकला त्या वर्षी पण घरी नाही आला. गहू, ज्वारी असूनसुद्धा तांदूळ किती माहत्वाचा असतो लहान मुलांसाठी, हे समजलं रश्मीला. पूर्ण वर्षभर विनिता आई शंकरदादाच्या आणि केदार काकांच्या दुकानातून तांदूळ विकत आणायची. खूप वर्षांनंतर सांगितलं रश्मीला तिचे आबा गेल्यानंतर शेताचे, नाडकर्णीच्या वाड्यातील वस्तूंचे वाटे झाले होते. भात खळ्यातून उचलून नेणं हा त्याचाच एक भाग होता. नाडकर्णी कुटुंब, ज्यांच्या कडे धान्याची पोती, तंबाखूचे बोद, गुळाच्या भेल्या ठेवण्यासाठी तीन – तीन घर पुरत नव्हती त्या कुटुंबातील बाळाला स्वतःच्या मळ्यात पिकलेला भात मिळत नाही म्हणून मालकिणीचे डोळे 😭 ओले झाले.

******************************

    स्वतंत्र बाणा, विचारपूर्वक वर्तन, स्वावलंबी जीवन आणि प्रसंगावधान हे सर्व शिक्षणाने प्राप्त होते. जबाबदारी आल्याशिवाय ती पेलवायची ताकत येत नाही. जबाबदारी पेलायची ताकत आहे की नाही? हे जबाबदारी अंगावर  पडल्याशिवाय समजत नाही. विनितावर आलेल्या जबाबदारीचा तिनं कधीच बाऊ केला नाही. शांतपणे आल्या प्रसंगाला तोंड देत राहिली ती. तिला खात्री होती, आपल्या तिन्ही मुलींचं भविष्य उज्ज्वल आहे. शिक्षण पूर्ण कधीच होत नाही. ती एक अव्याहत चालणारी प्रकिया आहे. "माझं शिक्षण संपलं म्हणणं किंवा पूर्ण झालं," म्हणणं म्हणजे "माझं जगणं संपलं," असंच म्हणणं. जन्मल्या पासून काहीतरी शिकत असतो आपण, पहिल्या स्वातंत्र श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत. शिक्षणानं विचार करायला प्रवृत्त होतो माणूस. प्रश्न विचारू शकतो. कार्यकारण भाव समजून घेऊ शकतो. सारासार विचार करून बुद्धीचा वापर करू शकतो. निर्णयक्षमता शिक्षणानेच विकसित होते. त्याचा प्रत्यय तर आलाच. वारंवार येत राहिला.

राजेशची पार्श्वभूमी…

    विचार करायला प्रवृत्त झाली रश्मी. रागात किंवा भावनेच्या भरात वहावत जाणारा स्वभाव नक्कीच नव्हता तिचा. जबाबदारीपासून पळणारी, जबाबदारी झटकुन टाकणाऱ्या पैकी नव्हती रश्मी. वचनाला जागणारी होती. एकवचनी होती रश्मी. लग्न झाल्यापासून, चाळीतील जीवनशैली आणि बऱ्याच गोष्टी समजल्या होत्या तिला. चाळीची सोसायटी झाली तरी माणसं तिचं होती. गिरण गावासारखी. वेगवेगळ्या पश्र्वभुमिमधून एकत्र आलेल्या लोकांची वेगळी संस्कृती तयार झाली होती. पण सोसाटीमधील एकही माणूस मिल मध्ये काम करणारा दिसला नाही. म्हणजे यातील बऱ्याचं कुटुंबाची दुसरी पिढी मुंबईची होती. गाव, तिथल्या संस्कृतीशी नाळ पूर्णपणे तोडलेल्या लोकांपैकी एक राजेशचं कुटुंब होतं. गरजेप्रमाणे बदल पचवले जात होते. जीवनमूल्ये बदलली होती. स्त्री-पुरुष संबंधांमध्ये नको तेवढा मोकळेपणा आला होता. बाल वयातील आणि टीन येज मधील मुलांना या स्थित्यंतराचे भलतेच आकर्षण वाटत होतं आणि सहाजिकच होतं ते. आई दिवसभर किचन आणि घर सांभाळून मुलांकडे लक्ष देण श्यक्य नव्हतं. म्हणजे ओघानेच हातात पैसे आणि अनिर्बंध स्वातंत्र्य होतं. नव्या बदलाच्या परिणमाची चिंता न बाळगता तो आत्मसात करणे म्हणजे पुढारलेले असा समज करून घेतला जायचा. मुंबईची अशी एक वेगळी ओळख निर्माण होत होती. लहान जागेत आपुलकीचे बंध तयार होत असताना काही तोटेपण झाले. बहीण - भावाच्या पवित्र नात्यांमधील बदल सहज दृष्टीस पडत होता. दीर - वहिनीच्या पावित्र नात्याचा मुलाहिजा नव्हता.

शेजाऱ्यांकडे रोज नवीन बाई नजरेस पडत असे. मंगळसूत्र एकाच्या नावे, राहायचं दुसऱ्या बरोबर. शेवटी एक दिवस अक्रित घडल. एक छक्काच आला कायमचं त्यांच्याकडे. शेवटी ते दोघे कोठे गेले समजले नाही. ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टी आपण इतक्या जवळून पाहू हे रश्मीला स्वप्नातही वाटलं नव्हतं. कित्येक गोष्टी खटकत असून स्पष्टपणे बोलता आल्या नाहीत रश्मीला. आपण काहीतरी विचारावं आणि त्यातून उत्तराऐवजी असे भाव दिसायचे नजरेत की, ही किती बावळट, गावंढळ आहे. तीनं पाहिलं, शेजारच्या वहिनी आपल्या दोन लहान मुलीना सोडून दुसऱ्या वेळेस बोहोल्यावर चढायला जाताना. त्या लहान मुलींची भकास नजर काळीज विदीर्ण करून गेली. कारण नवऱ्याने दुसरं बाई जवळ केली म्हणून त्यांनी पण तसाच निर्णय घेतला. त्यांना वाटलं 'जशास तसं', पण लहान मुली, त्यांच्या मनाचं काय? कित्तेक दिवस अस्वस्थ होती रश्मी. कित्तेक रात्री झोप नव्हती रश्मीला.

       समोरच्या घरामध्ये राहणाऱ्या सुमित या तरुण मुलाने एकदम दुसऱ्या धर्माच्या मुलीशी लग्न करून दरात उभा राहिला! सोपस्कार करून घरात तर घेतलं सुमित आणि रिमिला काकूंनी. कसबस एक वर्ष काढलं रिमिनं. तेवढ्या अवधीत गोड मुलीला जन्म दिला सुमित - रिमिने. सिया, एकदम गोड आणि सावळी मुलगी होती. सुमीतची आई, रिमीला दिवसभर घरकामात गुंतवून ठेवत असे. फुकट मोलकरीण मिळाल्यासारखे राबवायाची रिमीला, काकू आणि नणंद. वडील सुमित दिवसभर फॅक्टरी मध्ये काम करून महिन्याच्या शेवटी आईच्या हातात पगार ठेवायचा. छोट्या सिया बाळाला भूक लागली की रडायला लागायची. काकू आणि रिमीची नणंद यांना बाळाचं रडणं सहन होत नसे. त्या लहान बाळाला,"भिकारी," म्हणताना क्रूर चेहरा दिसे दोघींचा. माणसामधला पशू दिसे. हल्ली सुमित पण रिमिवर चिडताना दिसे. स्वतः रिमिन सासू, नणंदेचे आणि नवरा सुमित साऱ्याचे दशावतार पाहिले. पण छोट्या सीयाला, "भिकारी"म्हणून हिणवलं गेलेलं रिमीला सहन झालं नाही. रिमीने आर्ततेने आपल्या मैत्रिणी समान नणंदेला, भावा समान दिराला आणि आईसमान सासूला संसार वाचविण्यासाठी विनंत्या केल्या. सर्व व्यर्थ गेलं सारं.

सुमित काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. लग्नाचा निर्णय झटकन घेणारा सुमित जाबाबदारी पेलवायला असमर्थ ठरला. आई, बहिणीं पुढे हात टेकले त्याने. ती स्वतःची बॅग भरून, सियाला घेऊन रागाने घरातून बाहेर पडताना फक्त आणि फक्त घराचा उंबरा रक्त बंबाळ झाला. कारण ठेच लागली रीमिला. सुमित घायाळ झाला तो कायमचाच. बाकी साऱ्याना काहीच फरक पडला नाही. जन्मभर आई आणि बहिणीच्या धाकात राहिला आणि किडा – मुंगी सारखं जगला आणि तसाच मारून गेला, बेजबाबदार, असच वाटलं रश्मीला. कारण प्राणी, पशू , किडा, मुंगी यांचं जीवन म्हणजे जन्म घेणं, भूक शमवणं आणि मरणं,. हे फक्त आशा जीवमात्रा कडून अपेक्षित असते.

लहानपणी ऐकलेली कन्नड म्हण आठवली रश्मीला. ” हेणती अन्द्रे हिग्गतान, ज्वाळा अन्द्रे बग्गतान “. ( लग्न करायला एका पावलावर तयार, पण जबाबदारी घ्यायला असमर्थ ).
           पण सोसायटी मध्ये अशी काही कुटुंबं होती, ज्यांच्याकडे पाहून अद्याप आपली संस्कृती बाकी आहे हे दिसत होतं. नात्यामधला स्वच्छ आणि निखळपणा जपला होता. जुन्या नव्यांची सांगड घालून खूप सुंदर पद्धतीने आपलं कुटुंबं सांभाळत होते. सर्वच जूनं ते सोनं असतंच असं नाही; तसेच सर्वच नवं टाकावू किंवा स्वीकारार्ह असतं असही नाही. सुवर्णमध्य साधणं मधल्या पिढीने साध्य केलं. एकाच घरात नऊवारी, सहावारी साडी वापरणाऱ्या स्त्रिया आणि जीन्स घालणारी मुलगी /सून तिनंही पिढ्या एकत्र राहत. पण आतलं सुसंस्कृतपण जपलं होतं. पण हे बुजुर्ग असलेल्या घरामधील वातावरण. बाकी आधुनिकतेच्या नावावर नात्याच्या चिंधड्या दिसत होत्या. संक्रमणाचा काळ होता तो. सर्वात अगोदर बदलाची सुरुवात मुंबईत होतं असे. बदलाचा स्वीकार सर्वच स्तरातील लोक कमीआधिक प्रमाणात करत असत.

त्यावरून निष्कर्ष तर हाच निघत होता. पैसा आणि सेक्स या दोन गोष्टीच त्यांच्यासाठी अडसर बनणार नाहीत कशावरून. तकलादू संबंध असतात असे. पण आपण आतताई पणा केला तर त्यांचे कच्चे धागे पक्के बनायला वेळ लागणार नाही. प्रत्यक्षात हा जुगारच होता. पण मग लग्न काय होतं? जुगारच झाला तिच्या लग्नाचा, संसाराचा . ठाम विचार शृंखला एका ठाम निष्कर्षाप्रत आली. त्या नंतर उद्विग्न मन, स्थिर झालं.

तिला आश्चर्य वाटलं चर्चगेट जवळ जेव्हा क्रॉस करण्यासाठी सिग्नल वर एक कुत्रा सिग्नल सुटाण्याची वाट पहात थांबलेला दिसला. एवढी शिस्तप्रिय आणि नियमाचं पालन माणसं करतील तर अपघात होणार नाहीत. इथं माणसांपेक्षा जनावर माणसाचे नियम पाळतात.
               मातृसत्ताक पद्धतीवर भर असणाऱ्या सासरी ती पद्धत सासूबाईंपर्यंत मर्यादित होती. जसं जसं मुलं मोठी होतं गेली तशी सर्वजण आपापले संसार वेगळे मांडले. सणासुदीला, लग्न कार्याला एकत्र येत असत. पण भावंडांमध्ये एकी छान होती. काही गोष्टी चांगल्या होत्या पण काही खूप खटकणाऱ्या पण होत्या. आपण, आपलं काम, जबाबदाऱ्या सांभाळणं गरजेला मदत करणं हेच धोरण अंगिकारलं रश्मीने. पण जेव्हा सगळ्या गोष्टी हाताबाहेर जाताहेत असं दिसलं तेव्हा साऱ्याचं गोष्टीची एक अदृश्य साखळीचे विस्कळीत तुकडे दिसले तिला. ते एकत्र केले आणि चेन तयार केली, निष्कर्ष काढला.
       
          तिला गुरूंनी बोललेलं वाक्य आठवलं. “दोनच कारणांमुळे भांडणं होतात, एक सेक्स आणि दुसरं पैसे”.
फातिमा राजेशच नातं याच दोन गोष्टीमध्ये मोडत होतं. मुंबईच्या चाळीत वाढलेली फातिमा, छोट्या जागेत राहून तिला उबग आला होता. तिला झटपट पैसा आणि ऐशोआराम हवा होता. ज्या प्रमाणात राजेश तिच्यावर उधळपट्टी करत होता. सोन्या, हिऱ्याचे दागिने, महागडे ब्रँडेड कपडे, हॉटेलिंग यावरून पैसा तिच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आणि राजेश ज्याप्रमाणे ऑफिस – काम काढून बाहेर राहायचा. त्या वरून निष्कर्ष तर हाच निघत होता . या दोन गोष्टीचं त्यांच्यासाठी आडसर बनणार नाहीत कशावरून ? तकलादू संबंध असतात असे पण.  आपण आतताईपणा केला तर त्यांचे कच्चे धागे पक्के बनायला वेळ लागणार नाही.

मानस पूजा

तिला कित्तेक दिवसानी शांतपणे मानसपूजा करता आली मनासारखी.

तिला आठवल. साऱ्या वातावरणात अस्वस्थ मन एकाग्र होतं नव्हत. अट्टाहासाने मानस पूजा करण्यासाठी बसायची रश्मी…………


पूजेची सिद्धता झाली, समई आणि निरांजाची ज्योत प्रज्वलित केली. धुप लावला. रश्मी शांत बसली. डोळे मिटले. अनुलोम विलोम, दीर्घ श्वासो्छ्वास केला. धूप लावला. प्राणायाम झाला, ओंकार उच्चारण झालं. हृदयस्थ अनावृत दत्त पादुकावर दृष्टी स्थिरावली. श्री दत्त पादुका अभिषेकासाठी तयार ठेवल्या. दीर्घ ओमकार उच्चारण करत पंचामृताभिषेक केला, फळांचा राजा, आमरसाचा अभिषेक झाला. पाच पवित्र नद्यांच जल एकत्र करून ठेवलेला कलश हातात घेऊन पादुकांवर संतत धार धरून जलाभिषेक झाला. पादुका स्वच्छ वस्त्राने कोरड्या केल्या . चंदन लेपन केलं. पादुकांना रेशमी वस्त्र लपेटल. सोनचाफा, मोगरा, विविध रंगांची आणि सूवासाची कमळ फ़ुलं वाहिली पदुकांवर , तुलसीदळे आणि बिल्वदळे वाहिली, झेड ब्लॅक अगरबत्ती आणि धूप ओवाळले. नैवेद्य अर्पण केला. पादुकांवर नजर स्थिर झाली. सुंदर मनोहारी दृश्य. नजर हालत नव्हती पादुकांवरून. पण दोन पादुकांमधें हालचाल जाणवली रश्मीला. तिकडे दुर्लक्ष केलं. आता जप आणि प्रार्थना…. सुरु करणार इतक्यात दोन पादुकांच्यामधून काळाकुट्ट लांब नाग फणी उभारून बाहेर यायचा! दहाचा आकडा स्पष्ट दिसायचा फणीवर. आणि रश्मीची षोडश उपचारांनी केलेली मानसपूजा विस्कटून टाकायचा. फूलं इथं तिथं विस्कळीत व्हायची. समई त्याच्या लांब काळ्या शरीराचा सूळसुळाट आणि फुत्कारांनं कलंडून विझून जायची, निरांजनातली वात विझायची. आणि सर्वत्र अंधकार व्हायचा. झपकन डोळे उघडून पाहायची रश्मी. मनं आणि शरीर अस्वस्थ व्हायचं रश्मीचं.

कित्तेक वेळेस असंच झाल्याने रश्मीने मानसपूजा बंद केली होती आणि फक्त नामस्मरण सुरु होतं. कॉलेज मध्ये असताना शेजारच्या वहिनींकडे पूर्वी पाहिलेलं ओमच कॅलेंडर आठवलं.

Om”, has over hundreds of meanings , one of them is, “welcome to God”.
गुरुमंत्र, तारक मंत्र असतो. गुरूंनी सांगितलेला मंत्र, सूर्यनमस्कार आणि योगा, मानसपूजा, योगनिद्रा, प्राणायाम, साहित्य वाचन, मननं, चिंतन तिच्या खुप कामी आलं. आज हे सार जसच्या तसं समोर दिसत होतं. आज रश्मीला स्वतःच मन हलकं आणि तन पुलकित वाटत होतं.

               सोडून जाणे, डिवोर्स घेणं, आरडाओरड करणे, एकमेकांच्या  खानदानाची इज्जत चव्हाट्यावर आणणे , हार मानणे, निराशेत जाणे, स्वत:ला संपवणे हे उपाय चालणारे आहेत का?  कारण यापूर्वी हे सारे प्रकार सोसायटीमध्ये झालेले होते. आणि समाजामध्ये पण झालेले होते. एक घाव दोन तुकडे इथं योग्य आहे का ? कुटुंबं उध्वस्त झालेली जवळून पाहिली रश्मीने. त्याचे परिणाम लहान मूले भोगताहेत.
ठाम विचार शृंखला एका ठाम निष्कर्षाप्रत आली. त्या नंतर उद्विग्न मन, स्थिर झालं.

One Response

  1. कथेच्या ७ ही भागांचे सुंदर लेखन केले आहे,उत्तरोत्तर लेखनातही आपली अशीच प्रगती व्हावी, हीच श्री दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना 💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

“तू सदा जवळी रहा…” भाग – 53* अर्थात स्थित्यंतर पुर्व स्थिती

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

चिऊ आई🐤🐤

आज पुन्हा दारात माझ्याकरडी🦅 चिऊताई  आली,दोनचं दाणे चोचित पकडूनभुर्रकन उडून गेली. गंमत मी पाहात होतेदारात शांत बसून,करतेय स्वागत पक्ष्यांचं 🦅🦜🦆गालातल्या गालात 😊 हसून. पुन्हा येणं, दाणे

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 44 दादा, आजोबा भेट आणि ऍंथोनी मामा ❓️

भाग -1*  एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी, देवघरात 🕉️ 🙏 सुखावते…भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आई; 

Read More

” तू सदा जवळी रहा…” भाग – 52

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More