“तू सदा जवळी रहा…..” भाग – ८ अर्थात : आनंद “वाटणारा” राजेश

” तु सदा जवळील रहा…. “.
भाग -1* एक आईं , बायको, आणि नोकरी करणारी आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते …….
भाग -2* बाल मैत्रीण,
ज्योती ची भेट, पती राजेशचे प्रताप , आई विनीताला वाटलेली चिंता आणि आठवळलेल बालपण , …
भाग-3 * शाळा – कॉलेज , मोकळेपणाने वागण्याचा परिणाम, कठीण प्रसंग आणि मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट …

भाग – 4.* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई …
अनुभूती घेतलीत कुसुम ताईच्या व्यक्तिमत्वाची आणि रममाण झालात सई , चंदाच्या बालपणातील आठवणी
भाग -5 मध्ये आपण अनुभवलेत रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात, आईची परीक्षा सुरु. ….. पाचवा भाग संपताना प्रश्न नव्हते निशब्द शांतता आणि प्रार्थना बळ देते रश्मीला आणि कुटुंबियांना… 🙏.
भाग – 6* मध्ये आपण वाचलात रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी, आणि रश्मीचे वैधव्य सदृश्य जीवन.
भाग -7 * मध्ये वाचा एक सक्षम महिला असून पण रश्मीन गप्प राहून का सहन केलं सार — अन्याय, प्रतारणा, आर्थिक, सामाजिक, मानसिक, नैतिक अवहेलना. अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…

भाग -8* वाचा आईचं मानस दर्शन,
रश्मीला राजेशची प्रकर्षाने आठवण

आईचं मानस दर्शन…

       आज मानसपूजा खरोखरच सुंदर झाल्याने रश्मीचे मन प्रफुल्लित आणि तन हलकं वाटत होत. मानस पूजेच्या वेळी आरती झाल्यानंतर ती आपली आई राहत असलेल्या गावात पोहोचली. गॅलरीत गेल्यानंतर दरवाजा ढकलला. नेहमीप्रमाणे आईच पण दर्शन झालं. आई दुःखी वाटली तिला. कॉट वर पडून होती. औषधाची बाटली बाजूला दिसली. ही इतकी आजारी आहे ? काही सांगितलं नाही आपल्याला? का नाही सांगितलं आपल्याला ? रश्मीने स्वतःला प्रश्न विचारला. उतर तिला माहीत होत. आईचा फोन घेणं टाळत होती रश्मी. कशी सांगणार होती आई, रश्मीला? अस्वस्थ मनानं रश्मीने निरोप घेतला. डोळे उघडले. मानस पूजेतून जड अंत:करण घेऊन बाहेर आली .
पाचशे किलोमिटर दूर जाऊन तिची समजूत घालणं, विचारपूस कारणं शक्य नव्हतं तिला. तिला पूर्वीचा प्रसंग आठवला.

अशीच नोकरीच्या निमित्ताने रश्मीला खूप दूर जावं लागलं. त्यावेळी पण ती आजारी पडली होती रश्मीच्याच काळजीपोटी, पण सावरली. रश्मीला आणि आई विनिताची पत्र भेट होत असे. आणि त्यानंतर मात्र रश्मी आईच मानस दर्शन घेत असे . मनस दर्शनाच्या वेळी आई अती आजारी असल्याचे संकेत मिळाले अन् , रश्मी त्याच दिवशी आईला भेटण्यासाठी निघाली होती. पूर्णपणे खंगलेली होती विनिता आई. अन्न, पाणी वर्ज्य केले होते. पण रश्मीच्या दोन दिवसाच्या सहवासाने विनिता आईच्या तब्येतीमध्येक़ बराच फरक पडला. जबाबदारी नेहमीप्रमाणे सईवर सोपवून रश्मी नोकरीच्या गावी परतली.

रश्मीला राजेशची प्रकर्षानं आठवण आली!


तिला राजेशची प्रकर्षानं आठवण आली. रश्मी काही म्हणायची खोटी, तो एका पावलावर तयार असायचा तिची मनीषा पूर्ण करायला. लग्नाला काही महिने झाले होते. अचानक रश्मी अस्वस्थ होऊन रडायला लागली. बाहेरून आलेल्या राजेशला रश्मी ठीक नसल्याचं समजलं. रश्मीच्या चेहऱ्यावरून तिच्या मनातील चलबीचल राजेशला कळायची. अगदी खोदून विचारलं राजेशने तेव्हा, “आईची प्रकर्षानं आठवण येतेय”, एवढंच बोलली रश्मी. लगेच दुसऱ्या तासाला रश्मी – राजेश आईला भेटण्यासाठी निघाले पण. न थकता दहा तास गाडी चालवली त्यानं, आणि रश्मी आईच्या कुशीत होती .
आईच्या निर्मळ आणि प्रेमळ सहवासात निश्चिंत मनाने राहायचे रश्मी आणि राजेश. तो पण धाकाधाकीच्या प्रवाहापासून दूर असल्यामुळे खुश असे. राजेश आणि आई दोघांच्या सहवासात रश्मीला स्वर्ग सुखाचा आनंद मिळे.
जेव्हा राजेश आणि रश्मीचे लग्न ठरलं तेव्हा तीन साऱ्या गोष्टीची कल्पना दिली होती. आईनं, आबांच्या माघारी तिघीं मुलींना वाढवताना घेतलेले अपार कष्ट आणि रश्मीचे उतरदाईत्व याची पुरेपूर कल्पना दिली होती. राजेशचा रश्मीच्या आईबध्दलचा आदर द्विगुणित झाला होता. आई, बहिणी, चुलत, मावस भावंड, आत्या, काका रश्मी पेक्षा राजेश बरोबर जास्त गप्पा मारायचे. वेळप्रसंगी राजेश स्वतःच रश्मीच्या माहेरी जाऊन भेटून येत असे. अशावेळी रश्मीला आनंद आणि आदर वाटे राजेशबद्दल. शब्द नसतं तिच्याकडे. तिला लग्नात राजेशने दाखवलेला सामंजस्य आठवले. हुंडा, देवाण – घेवाण या बाबत त्यानं एका पैशाची अपेक्षा ठेवली नाही की, खर्च करू दिला नाही लग्नात. उलट विनिता आईकडून रश्मीने काही वस्तु घेतल्या तर तिला रागे भरत असे.
रश्मीवर जीवापाड प्रेम करणारा आणि तिच्या आई , बहिणी, भावंडांचा आदर करणाऱ्या राजेशचा अभिमान वाटायचा रश्मीला.
रश्मीला वाटायचं, “आपण काही मागितलं नाही, काही अपेक्षा केली नाही तर भांडण, वाद, रुसवे, फुगवे होणारच नाहीत.” दोघेही समजूतदार त्यामुळे वाद होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. लग्नापूर्वी कोणतेही निर्णय रश्मी स्वतः पटकन घेऊ शकत असे. पण लग्नानंतर असे निर्णय घेताना अडचणी वाटायला लागल्या. रश्मीला आठवलं, तिच्या शेजारी राहणारी शोभाताई तिला म्हणाली होती, “रश्मी तू इतक्या सहज आणि पटकन कोणतीही गोष्ट कसं काय ठरवू शकतेस? कोणताही नीर्णय झटकन कशी काय घेवू शकतेस? दुसरे दिवशी कोणती भाजी करायची हे ठरवणे सुध्दा मला अवघड जातं.” तेव्हा रश्मीला शोभा ताईच्या बोलण्याच आश्चर्य वाटले होते. पण आता रश्मीला जाणवतयं. जेव्हा दोन भिन्न व्यक्ती, वेगवेगळया विभागातून, वेगळ्या पार्श्वभूमीवरून, संस्कारातून एकत्र येतात त्या वेळी परिस्थिती वेगळी असते. इथे तसेच झाले. राजेश – रश्मी दोघेही प्रौढ होते. विशेषतः रश्मी नोकरीसाठी अलग ठिकाणी राहिल्याने विचार आणि समजुती ठाम होत्या. काही गोष्टी पटवून घेतल्या पण काही पचनी पडत नव्हत्या. आणि मग अशावेळी राजेशचा आवाज टिपेला जायचा आणि अगोदरच बुजरी असलेली रश्मी अजुनच अबोल व्हायची.
आपापसात कोणी भांडत असले तरी चार पावलं दूर राहणं पसंत करणारी रश्मी आरडा-ओरड, भांडण, आदळ-आपट, शिव्या, मार-झोड, चोरीचे आळ या पासून कोसो दूर होती. पण लग्नानंतर पूर्ण आयुष्य बदलून गेलं.
राजेश बद्दल सर्व जण चांगलच बोलताना ऐकलं होत. इतराच्या मते तो खूप दयाळू होता. लोकांना आनंद “वाटे” तो, असचं ऐकलं रश्मीने. फक्त रश्मीला आलेल्या अनुभवानंतर लक्षात आल की तो हलक्या कानाचा आहे. कुणी काही सांगितले की पुढचा मागचा विचार करत नसे. आणि मग तो काहीही कारणाने रश्मीशी असंबद्ध वागत असे. खूप वेगळे अनुभव येत गेले रश्मीला.

“तू सदा जवळी रहा….”
भाग -९ वाचा पुढील शुक्रवारी राजेश बद्दल…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

पुस्तक वाचून श्रीमंत कसे व्हावे? प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad भाग – 2

खूप शिका. चांगले मार्क्स मिळावा, चांगली नोकरी मिळेल. भरपूर पगार मिळेल. हे परंपरागत मिळालेले उपदेश घेऊन मोठी झालेली आपली पिढी….सगळ्यात आहे पण कशातच नाही अशी

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग 51

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

“जिसे डरते थे… ‼️”  भाग 2

भाग – 1 संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह भाग – 2,

Read More

“जिसे डरते थे…” थ्रिलर.. सत्य घटना 🙏

संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह संकट आणि मुकाबला, मनामागे, मनोवेगे ‼️

Read More