“तू सदा जवळी रहा….” भाग – ४ अर्थात कुसुमताईची 🙏 अनुभूती.

भाग – १. आई, बायको, आणि नोकरी करणारी महिला. देवघरात शांती शोधते. भाग-२.बाल मैत्रीण ज्योती – भेट, पती राजेशचे प्रताप, आईला वाटणारी चिंता, शाळा कॉलेज मध्ये जाणारी रश्मी भाग – ३. रश्मीवर आलेलं संकट, विनितांन घेतलेली मदत आणि आई बहिणींना सोडून गेलेली रश्मी. ….. भाग ४ “कुसूम ताई”, आणि ” रश्मीच्या दोन छोट्या बहिणी चंदा आणि सई” …

“कुसुमताई”

        रश्मीला सुरक्षित ठिकाणी हलवून पण कुसुम ताईचे शब्द सतत आठवत राहिली विनिता. विनिताला दहा वर्षांपूर्वीची कुसुमताई आठवली ….

        सुंदर रोषणाई केलेला वाडा, दोन्ही बाजूला नारळाच्या कोवळ्या पानांची तोरणे, दरवाज्यात सडा टाकून काढलेली रांगोळी आणि भरलेले रंग. गणेश दरबार अगरबत्तीचा आणि लोबान धुपाचा सुगंध दरवळत होता. नजर मात्र कुसुम ताईचा शोध घेत होती. ताईंचा हसरा प्रेमळ कटाक्ष विनिता वर पडला की आकाश मुठीत सापडल्याचा आनंद मिळे तिला.

कुसुमताई एक बड प्रस्थ होतं. पाच फूट, सहा इंच उंची, लंबगोलाकार आणि गोरापान चेहरा, कपाळावर रुपयाच्या नाण्या एवढं मोठं, लालभडक कुंकू. मंगळसूत्रा बरोबर बोरमाळ आणि जोंधळीपोत, कानात मोत्याच्या कुड्या, हातात हिरव्या रेशमी काचेच्या बांगड्या, पाटल्या, बिलवर, तोडे आणि बोटांमध्ये सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या आंगठ्या. पायात नाजूक पैंजण, आणि जोडव्या. मोठ्या डोळ्यात काजळ कोरलेले असे. नाकात हिऱ्याची चमकी शोभून दिसत असे.


“माले sss, माले ssss. हुवा माले तगोरी sss” आवाज आला आणि आबोली – मोगऱ्याचे गजरे घेऊन नेहमीसारखा पुट्ट्या आला.
बस स्टँडवर गजरे विकणारा पुट्ट्या गावात गजरे विकायला येई. ताई बाहेर येऊन गजरे विकत घेईपर्यंत, “माले मालेssss” ओरडत राहायचा. एरवी एका गजऱ्याला दोन रुपये शिवाय कोणालाही हात लावू न देणारा पूट्ट्या कुसुमताई समोर ना घासाघीस करायचा ना आढेवेढे घ्यायचा.
ताई सैलसर आंबड्या वर नेहमीचं सोन्याचं फुल खोचायच्या आणि आबोली – मोगऱ्याचा गजरा माळायच्या. गर्द हिरव्या ईरकली साडीत ताईचं दैवी, भारदस्त व्यक्तिमत्व पाहणाऱ्याला भारून टाकायचं.
सारच भारी वाटायचं. ती फक्त विनिताची किंवा तिच्या भावंडांची ताई नव्हती. साऱ्या पंचक्रोशीतुन बाया बापड्या गाऱ्हाणं घेऊन यायच्या. आपुलकीने भरलेलं स्वागत आणि तोंडातून मोती बाहेर पडावेत तसं बोलणं आलेल्या भक्ताला आपलंस बनवत असे.

वाड्यात पाऊल ठेवताच विनिताचं चित्त प्रसन्न झालं. भक्तांच्या प्रश्नाला अनुसरून भगवत गीतेतील ठराविक पान उघडून ताई उतर द्यायची. समाधानाने आणि तिचे शब्द प्रमाण मानून भक्त घरी परतत असत.

खडया, खणखणीत आवाजात देवीला आव्हान दिलं जायचं.  “जगदंब, जगदंब, जनक कल्याणी, करवीर क्षेत्र निवासिनी, आईं आंबाबाईss, तुळजापुरी भवानीss🙏🌺 भक्ताला पाव. त्यांचं दुःख दूर कर.” 🙏🌺

ताईच्या शब्दाला धार होती. आव्हान होतं. देव्हाऱ्यातील लक्ष्मीची मूर्ती समईच्या आणि आरतीच्या प्रकाशात उजळून निघत असे. मग आरती सुरू व्हायची.

विनिताच्या दिरानी तिला दोन – तीन वेळेस आग्रह करूनही ती कुसुमताईना भेटायला गेली नाही. परंतु दिरानी तिला कुसुमताईंचा पत्ता देऊन पुन्हा पुन्हा भेटायला सांगितले होते.

कुसुमताईच्या भावाने त्यांना भेट म्हणून, भाऊबीजेला ओवाळणीच्या तबकात, “श्रीमद् भगवद् गीता” ठेवली. आणि गृहिणी असलेल्या कुसुमताईनी त्याची पारायणं केली. ताईच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळाच पैलू पडला. त्यांच्या प्रेमळ दृष्टीने, आशीर्वादाने, अंगाऱ्याने, प्रसादाने रंजलेल्या, गांजलेल्या माणसांना गुण येऊ लागला. त्यांच्या अडचणी दूर होऊ लागल्या. दैवी देणगी प्राप्त झालेल्या कुसुमताई त्यांच्या स्वतःच्या भावाबरोबर सर्वांच्या ताई झाल्या.

टाळ, मृदंग, घंटेचा आवाज आणि त्यात आरतीचे 🎶🎵 शब्द मिसळायचे …
   “आई भवाssनी, आंबा भवाssनी,
आमची sss ही कुलस्वामिनीsss,
उद्धरीले जग जीवनी … ||

       आरती झाली, नैवेद्य झाला, प्रसाद घेतला. सर्वांची पंगापांग झाली. विनिता नमस्कार करून निघाली … पण कुसुम ताईने विनिताचा हात हातात घेतला.
” तू ना काही बोललीस, ना काही प्रश्न❓️ विचारला. पण मला माहीत आहे.
     “कर्माण्ये वाधिका रस्ते
      मा फलेशू कदाचन”||

या उक्ती प्रमाणे, तू तुझं कर्म करत राहणार.
           सीतेची अग्नी परीक्षा एकदाच झाली पण तुला वारंवार द्यावी लागेल 🔥अग्नी परीक्षा. जेवढया वेळेस अग्नी परीक्षा देशील तेवढीच उजळून निघणार तू. अगदी शेवट पर्यंत. तुझ्या आपल्या लोकांसाठी. अगदी तू ज्यांच्या साठी जगते आहेस ते सुध्दा घेतील तुझी 🔥🔥आग्नी परीक्षा …..”


बोलत असताना विनिताला हातात काहीतरी जाणवलं, पाहते तर काय ? भक्त मंडळी ज्या कृपा प्रसादासाठी डोळ्यात प्राण आणून वाट पाहतात तो प्रसादाचा रुपया कुसुमताईने विनिताच्या हातात ठवला होता.

ताईच्या गळ्या खाली गोऱ्या त्वचेवरील पादुका आणखीनच उठून दिसत होत्या. भगवद गीता वाचताना तिच्या मंगळसूत्राच्या वाटी खाली दोन पादुका आपोआप उमटल्या होत्या. तिची कंठातून बाहेर पडणारी वाणी भक्ताच कल्याण चिंतायची. तिचे शब्द प्रमाण मानत भक्तगण.

विनितांन अविश्र्वासान पाहिलं कुसुमताई कडे आणि रस्ता पकडला घरचा.
कर्माच्या वाटेवर चालण्यासाठी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील रेषा पुसट झाली की माणूस दैवावर विश्वास ठेवतो. विनिता दैववादी नक्कीच नव्हती. तिचा स्वतःच्या कर्मावर विश्वास होता आणि मनगटात धमक होती, आणि कुसुमताई हे सर्व जाणून होती. विनिताच्या हिम्मतवान स्वभावाला दाद, साथ आणि आशिर्वाद होता तिचा.

विनिताला पूर्वीची कुसुमताई आठवली. इतकी सोज्वळ ताई असे शब्द तोंडातून बाहेर कसे पडले …
कोणती कुसुमताई खरी ? रश्मीला आपल्यापासून जरी दूर पाठवली तरी कुसुमताईचे शब्द सारखे कानात घुमत होते. आपण ताईंचा सल्ला वेळेतच घेतला याबद्दल तिला स्वतःला बरं वाटलं कुसुमताईच्या शब्दात तळमळ होती. आपल्या मुलीबद्दल आपुलकी होती हे विनिता समजत होती.
विनिताला आठवल, ताईंचा संताप त्या नराधम टोळीवर होता. तिचं अंग थरथरत होते. चेहरा लाल झाला होता. आग ओकत होते ताईचे डोळे. तिच्या तोंडातून शिव्यांची लाखोली बाहेर पडत होती.

“रांडीचे, पोरीबाळीना बाप का मालं समजतात”. संतापून थांबली नाही ताई. सल्ला पण दिला … रश्मीला तेथून हलवण्याचा. आणि रश्मिवर येऊ घातलेला वाईट प्रसंग टळला होता.

🌹🌺🥀🌹🥀🌺

बालपणीची सई आणि चंदा,
रश्मीच्यl छोटया बहिणी ,

    रश्मी सहावी पास झाल्यानंतर आपल्या आत्या बरोबर तिच्या गावी गेली होती. मस्त पैकी मजा करून परत घरी आली रश्मी. धावत येऊन सई बिलगली रश्मीला… पुढे जाऊ देईना तिला आणि बोबड्या बोलात बोलली,” मला शोलून जाऊ नको. मला शगले लागावतात.” आई आणि आजीचे डोळे पाणावले. सईने रश्मीला मारलेली मिठी आणि बोबडे बोल ऐकून, ताईआजीला आणि आईला आदले दिवशीचा प्रसंग आठवला. “अंघोळ करायला जा,”असे सांगून पण सई ऐकेना म्हणून तिला हलकासा फटका दिला ताईआजीने. विनिताआई पण रागावली. आई आणि ताईआजी आपापल्या कामात गुंतलेल्या असताना, चंदा दोघींचा हात धरून बाहेर खेचत होती. दोघींना आवाज न करण्याविषयी तोंडानेच खुणावत होती. पण जेव्हा त्या दोघींनी सईला पाहिलं तेव्हा त्याचं मन हेलावून गेल. चिकूच्या झाडाखाली बसून सई एकटीच बडबडत होती. हुंदका देऊन, देऊन रडत होती. “लश्मी आक्का तू केव्हा येती आहे?” “मला हे शगळे लागावतात,” आणि मुसमुसून रडत होती. आणि आज समोर तिला रश्मी आक्का दिसली. तिचं लडिवाळ आणि बोबडे बोल ऐकून रश्मी पण स्वतःचे अश्रु आवरू शकली नाही. आणि आपण स्वतः लहान होऊन बोबड्या बोलात उत्तर दिलं तिला, “मी तुला शोलुन कुठ्ठे कुठ्ठे जानाल नाही.” तेव्हा सईची मिठी सैल झाली .

           चंदाला थोड कळत होतं. पण सई खूपच लहान होती. सई बद्दल रश्मीला एक वेगळाच जिव्हाळा होता. तिची माया कधी आईचं काळीज होऊन, कधी मोठी बहीण, कधी तिच्या भोवती आपलं सुरक्षा कवच ठेवायची रश्मी. सईच्या डोळ्यात पाणी आलेले रश्मीला सहन नाही व्हायचे. कधी राग, कधी संताप, कधी अगतिकता वाटायची सईला दुःखी, अस्वस्थ बघून. सई बद्दलच प्रेम नेमक कोणत्या शब्दात व्यक्त करावं समजत नव्हतं तिला. पण सई म्हणजे निर्व्याज, निष्पाप प्रेम करणारी आणि फक्त प्रेमाची अपेक्षा करणारी खूप छोटीशी बहीण होती रश्मीची. लंबगोलाकार चेहरा, आईसारखे लांबच लांब काळेभोर केस, कमलपुष्पासारखे बोलके, मोठे आणि काळेभोर डोळे आणि उंची मात्र; आबांसारखी ताडमाड.

12+34-56÷78×910= गणीत

वर्गामध्ये गणित सोडवायला जमत नाही म्हणून इयत्ता चौथीत असताना गुरुजींनी वेताच्या छडीन मारलं तर; इतकी कळवली होती सई की रश्मीला सहन झालं नाही झोपेत सईचं मुसमुसत रहाणं आणि घाबरून उठण उठणं. रश्मी आणि चंदाने दुसरे दिवशी विनिता आईचा हात धरून, गुरुजीं समोर उभं केल आईला. आणि ‘सईला मारू नका, गणित समजावून सांगा तिला’ असे विनिता आईंने गुरुजींना सांगितल्यावर शांत झाल्या दोघी. विनीताने आपल्या तिन्ही मुलींवर असेच संस्कार केले की, त्याच्या मनामध्ये एकमेकीविषयी प्रेम आणि आदर, आपुलकी ओतप्रोत भरून राहिली होती. जर कुणी सईला किंवा रश्मीला चिडवलं तर, चंदा एकदम आक्रमक होऊन भांडायची.

सईच्या रुमालाशी गप्पा !


विहिरीचं इंजिन सुरू झालं तसं पाटातून पाणी वाहू लागलं. काल आईंने दिलेला नवा रुमाल घाण झाला म्हणून पाण्याच्या पाटाकडे धावली सई. तशी पाठीमागे चंदा धावली. सई रूमालाशी गप्पा मारत तो स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत होती. “वासाचं साबण लावलं तरी तेच , निरमा साबण लावल तरी तेच. किती घाण करून घेतोस?” तिचे संभाषण ऐकून चंदा जोरजोरात हसू लागली. सईचे बोल, बोबड्या बोलात तिला पुन्हा पुन्हा ऐकवून तिला चिडवु लागली.

🪱🪱🪱🪱

जशी रात्रीची जेवण झाली तशी सई आणि चंदा झोपी गेल्या. विनिता आई आणि ताईआजी जेवता जेवता गप्पा मारत असताना रश्मी पेंगुळलेली असून पण झोपायला जात नव्हती. आईंने डोळ्यांनीच दटावले आणि लवकर झोपी जाण्यास सांगितले तशी रश्मी, चंदा जवळ आली पांघरूण घेणार इतक्यात तिला चंदाच्या चादरीवर साप दिसला. भीतीनं गाळण उडाली तिची. झोप तर पळालीच. त त प प … करत धडपडली.

बोलता येईना. तशीच धावत स्वयांपाक घर गाठलं आणि आईला हाताला धरून खेचत साप, साप ओरडली. प्रसंगावधान राखत विनितांने कोपऱ्यात ठेवलेली काठी हातात घेतली आणि प्रथम चंदाच्या आंगावरची चादर खेचली जोरात. चंदा बाळ सुरक्षित झाल्याची खात्री झाली तसं ताई आजीने सापाच्या डोळ्यावर जोरात रॉकेल फेकल जेणेकरून त्याला दिसू नये … आणि विनिताने कोपऱ्यात आडोसा शोधणाऱ्या सापाला झोड झोड झोडला. निपचीप उलटा होऊन पडलेल्या सापाकडे रश्मी 🙄 डोळे फाडून बघतच राहिली. आवाजान जाग्या झालेल्या चंदा आणि सई विनिता आईला घट्ट बिलगल्या होत्या

जन्मदाती, जीवनदायी, निर्भय, कणखर, प्रसंगावधान ठेऊन पटकन निर्णय घेवून अंमलात आणणारी असा आईचा पैलू आजीला आणि रश्मीला भावला. ताई आजीनं फक्त विनिताच्या पाठीवरून हात फिरवला. त्यात प्रेम,आधार, विश्वास आणि नातीच रक्षण करण्यासाठी कुणाची ही मदत न घेता विनिताने उचललेलं धाडसी पाऊल आणि त्याला ताई आजीने दिलेली शाबासकीची थाप होती. तिनं रश्मीला जवळ घेतलं. पाच जणी न बोलता सर्वांनी एकत्र मिठी मारली. निशब्द शांतता होती सर्वत्र. तेव्हा रश्मिची आई तिचा हिरो होती..…. मनामध्ये प्रेम, आदर, माया सारच दाटून आलं रश्मीच्या.
“आई” आईचं असते. आपल्यावर अवलंबून असणाऱ्या बाळाचं रक्षण करणं, निशिदिन त्याच भलं चिंतणे हेच इती कर्तव्य. बाळाचं बोलणं, वागणं, संस्कार, अभ्यास, आजारपण यामध्ये झोकून देणं. त्याची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी भक्कम आधार बनणे. मानसिक, भावनिक आधार देणे आणि संस्कारी बनवणं. विनिता जे स्वतः जगत होती ते जीवंत पुस्तकच होत संस्कारांच.

आई माझी धाडसी आणि बेडर,

त्याला प्रसंगावधानची जोड||

कोणी वाईट हेतुने आलं जवळ,

न बोलता झोडायची झोड झोड||

आईच्या वेगळेपणाची जाणीव; पुनश्च दृढ झाली. संकटकाळी मदतीला धावणारी दुर्गामाता दिसली आईमध्ये 🙏. पण देवीची उपमा देऊन तिच्या कर्तृत्वाला देवत्व बहाल करून तिचं कर्म चमत्कार ठरवता येत नव्हतं. अशा आई आणि बहिणींना सोडून दूर राहताना, एकेक आठवणी मनामध्ये भावनिक हिंदोळे निर्माण करत होत्या रश्मीच्या.

कोठून आल विनिताकडे येवढं धाडस?
का आधार वाटत होता ताई आजीचा, विनिता आणि तिन्ही मुलीनां ?
वाचा रंजना राव यांचे
“तू सदा जवळी रहा ….”
भाग ५ मध्ये

7 Responses

  1. . अप्रतिम च केवळ!
    आशाणाम् मनुष्याणाम्
    काचीत आश्चर्य श्रुंखला
    ययाबध्दा प्रदावंती
    मुक्ता स्थिष्ठंती पंगुवत . कथेतुन अनेकाना बोध मिळेल . जीवन एक संघर्ष त्याला विनिता सारखे सामोरे जा .

  2. विनिता सारखी दुसरी व्यक्ती होणे नाही . संघर्ष आणि तो पण सातत्याने येणारा . पण त्यातून तिनं आपल्या मुलींवर केलेले संस्कार मिळवलेले यश अतुलनीय
    धन्यवाद मॅडम नंदा . तुमचे अभिप्राय सर्वोत्तम साहित्य निर्मितीची प्रेरणा देतात . पुनश्च आभार .

    1. धन्यवाद🙏 आपलं मत भविष्यातील चांगल्या साहित्य निर्मिंतीस प्रेरणादायी ठरेलं.🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

काव्य प्रसूती – गोड अनुभूती

र ला र, ट ला ट जोडूनरटाळपणे जमवलेल्या यमकांना मी म्हणत नाही कविता.उत्स्फूर्त पणे घरंगळणाऱ्या;अर्थ आणि आशयांनी भरून वाहणाऱ्या; शब्द मोत्यातून हृदयाच्या तारा छेडणाऱ्या; रोमांच

Read More

” तू सदा जवळी रहा…” भाग – 56

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतीतार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 55*

भाग – 41* सर्व गुणसंपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

🙏🌍 धरती 🌍🙏

🌍🍚🌹🍇👣👨‍👩‍👧‍👧🏄‍♀️🐠🐥🐯🍑🏠🌈 पृथ्वी म्हणा, भूमी म्हणाकोणी म्हणा 🌏 धरा, सुप्रभाती नित्त्याने ‘महि’मातेला प्रथम प्रणाम करा 🙏🌍🙏🌍🙏🌍 जन्मापासून पोषण करतेकर्म 🍚 करत राहते,सांगत नाही, 🤫 बोलत नाहीश्रेय

Read More