पूर्व सूत्र
भाग – १. एक आई, बायको, आणि नोकरी करणारी आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते …….
भाग – २. बाल मैत्रीण ज्योतीची भेट, पती राजेशचे प्रताप, आई विनीताला वाटलेली चिंता आणि रश्मिला आठवलेलं स्वत:च्ं बालपण , …
भाग – ३ . शाळा – कॉलेजमध्ये मोकळे पणाने वागण्याचा परिणाम, कठीण प्रसंग, मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट …
भाग – ४. विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची, “कुसुम ताई …”
आणि रममाण झालात सई,
चंदाच्या बालपणात.
भाग – ५. मध्ये आपण रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात, आईची परीक्षा सुरु. ….. पाचवा भाग संपताना प्रश्न नव्हते निशब्द शांतता आणि प्रार्थना, जी बळ देते रश्मीला आणि कुटुंबियांना… 🙏. भाग – 6.
६. रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी
🎵🎶
रश्मीचं वैधव्यसदृश्य जीवन —
रश्मीच्या आई बद्दलच्या संगीतमय आठवणी 🎵🎶
प्रार्थना करीत असताना रश्मीची दृष्टी दत्तगुरूंच्या मूर्तीवर होती. चांदीच्या निरांजनात तेवणारी फुलवात आणि समईमधील ज्योतीच्या प्रकाशाची आभा मूर्तीवर पडली होती. गणेश दरबार अगरबत्तीचा मंद सुगंध, देवघरात दरवळत होता. जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी, विनिता आई आणि श्री दत्त गुरूंचा आशीर्वाद आपल्या मस्तकावर असणार आहे. तिच्यावर कितीही मोठं संकट आलं तरी, त्यातून बाहेर येणार याची खात्री होती रश्मीला. कोणाच्या तरी रूपाने मदतीचा असा काही हात मिळायचा की, श्रद्धा डळमळीत होण्याचा प्रश्नचं यायचा नाही.
सत्व परीक्षा खूप झाल्या. पण प्रार्थनेतून आत्मिक बळ प्राप्त व्हायचं तिला आणि साऱ्यां अडचणींवर मात व्हायची. विनितानं तीनही मुलींना शिक्षण देऊन, संस्कारी, स्वावलंबी बनवून, लग्न लावून दिली. चंदनाला लाज वाटेल असं झिजली विनिता माऊली. सुगंधित केलं मुलींचे जीवन अगदी निरपेक्ष भावाने. अज्ञान मुलींची फक्त पालनदार झाली. पण विनिताचे कष्ट संपले का? सगळं सुरळीत होतं का?
जीवनाचा रथ धावत होता पण रश्मीचं खळाळत हास्य कुठंतरी हरवलं होतं. रश्मीची आई विनिता वरून जरी शांत असली तरी आतून मात्र अस्वस्थ होती. आज ज्योतीला भेटून महिना झाल्याचं आठवलं तिला. कित्त्येक दिवस साठवलेलं दुःख, बांध फुटल्यासारखं वाहू लागलं ज्योतीच्या भेटीत. तिचं मन बरचं हलकं झालं होतं. अशा परिस्थितीत विनिताआई काय विचार करत असेल? रश्मीच्या मनात विनिता आईचा चेहरा डोकावला. वडिलांच्या अपघाती जाण्याने कित्ती खचली असेल विनिता आई ? तिला पुन्हा उभारणीसाठी कसं मिळालं असेल बळ? विनीता आईला स्वता:च्या आणि तिघी मुलींच्या भवितव्याबद्दलचे यक्ष प्रश्न❓️ आ वासून उभे असतील. कांही गोष्टी रश्मीला समजायच्या. कांही गोष्टी समजायच्या नाहीत. भीती कधीच वाटली नाही. पण विनिता आईचा जुना आजार बळावला की उगाचच मोठं झाल्यासारखं वाटायचं. “आपलं शिक्षण सुटेल का ? मग बहिणींची जबाबदारी आपण कशी पेलवणार आहोत? असे प्रश्न रश्मीच्या डोक्यात घोळायचे. पण….
विनिता आईला नं बोलताच रश्मीच्या मनातील भय आणि विचार समजायचे. रश्मीला जवळ बसवून तिच्या पाठीवरून हात फिरवायची. मऊ मायेचा, मऊ साईचा, अश्वासक, “मी आहे तुझ्या बरोबर कळजी करू नको” हा संदेश शरीर – मनाला हाताच्या स्पर्शा द्वारे मिळायचा. जगात अस्तित्वात असलेल्या कोणत्याच भाषापैकी नव्हती ती स्पर्श भाषा. ती खास मुलगी; रश्मी आणि आई विनिता साठी प्रेम – स्पर्श- विश्वास अणि बरेच काही संदेश असलेली भाषा असायची. दोघींच्या अत्म्याची भाषा असायची. रश्मीला दिलासा मिळायचा. “आपण विनता आईचा हात हातात घेतला तर मिळत असेल कां दिलासा ❓” रश्मीच्या मनात विचार चमकून गेला. पण मग् मात्र विनिता झपाट्याने बरी व्हायची. रश्मी, चंदा, सई घरी आल्या की, विनिता आईचं घरात असणं घर आणि मनं दोन्ही प्रसन्न करायचे. तिचं एक रूप रुतून बसलं होतं मनात; अगदी लखलखीत स्वच्छ
गाण्यांचा खजिना होता तिच्याकडे. कधीकधी हिंदी चित्रपटातील गाणी पण गुणगुणायची. स्वयंपाक घरात चुलीवर आमटी ढवळताना ती बऱ्याच वेळेस हीच गाणी गुणगुणायची. चेहरा प्रसन्न वाटायांचा तिचा.
गळ्यात माझ्या तूच जिवलगा मंगल मणी बांधिले,
जन्मो जन्मीची सुहासिनी मी तुझ्या मुळे जाहले||
आणि
असावे घर ते आपुले छान, ….
पुढे असावा बाग बगीचा,
वेलं मंडपी जाई जुईचा,
आम्र तरुवर मधुमासाचा,
फुलावा मोहर पानोपानं …
असावे घर ते आपुले छान…||
आणि
एक वार पंखावरुनी फिरव तुझा हात.
शेवट ते घरटे माझे तुझ्या अंगणात,
ऐ मालिक तेरे बंदे हम | ऐसें हॊ हमारे करम | नेकी पर चले, और बधिसे टले, ताकी हसते हुये नीकले दम ||
यादों की बारात निकली हैं यारो, दिलं के द्वारे,
हम को मन की शक्ती दे नां मनविजय करे, दुसरो के जैसे पेहेले खुद को देख ले ||
ती फुलराणी म्हणताना मजा वाटायची
कधी भाव गीतात तर कधी भक्ती गीतात भिजवून चिंब करायची. आई वडिलांची थोरवी गीतातून समजायची.
विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला,
मला भेटण्याला आला, मला भेटण्याला….
देव्हाऱ्यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ,
चरणांचे त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला…..||
आई बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी,
कशाला जाऊ मी पंढरपूरी?
ही गाणी ऐकताना खूप भारी वाटायचं.
गळ्यातून शब्द फ़ुलं होऊन बाहेर पडायचे. ना पेटीची साथ, ना कोणतेही वाद्य असे. तिची गाण्याची तान मोडू नये म्हणून रश्मी आणि चंदा न आवाज करता हळू पावलांनी गृह मंदिरात पाय ठेवायच्या. उद्देश हाच की मंदिरातील शांती भंग नको व्हायला. होय, मंदिरच होतं ते. आई जिथं पाय ठेवील ते ठिकाण पवित्रच होतं. तिच्या वास्तव्यान पुनीत झालेले घरं रश्मी, चंदा आणि सई तिघीना मंदिरच होतं. तिथं अमंगल, अपवित्र आसपासही फिरकत नसे. आलंच असं काही अमंगल तर ते टिकत नसे. त्या चौघींच्या केसालाही धक्का लावायची कोणाचीही हिम्मत नव्हती. चोवीस तास जागता पहारा वाटायचं आईच अतित्व. विनिता आईची, आबांवर प्रेमयुक्त श्रद्धा आहे. त्याचं भक्तिभावाने ती प्रत्येक गोष्ट करत असावी. ती कर्म करून परमात्म्याला आणि आबांना अर्पण करत असेल. कधीकधी तिच्या बोलण्यातून या गोष्टी जाणवतं असत.
तिच्या मनी कसलीही आस नव्हती. ना कधी खंत वाटेल अशी अपेक्षा ठेवली विनिता आईने. तो जग्गनीयंता वरून सर्व पाहतो, जाणतो. आपला देह कर्मा करता आहे आणि ते करत राहायचं एवढंच माहीत होतं तिला. कित्ती स्थितप्रज्ञ होती ती. तिला आठवलं आईच प्रार्थना म्हणतानाच रूप…. तिचं प्रार्थना आळवण…
प्रार्थना देवा तुला ही, तु सदा जवळील रहा,
मी जिथे जाईन तेथे, प्रेम दृष्टीने पहा ||
खंत नाही मज कशाची, आस नाही मानसी,
तु नभाच्या लोचनानी सर्व काही जाणिसी,
देह हा कर्मात शिरुनि, सफल होवो जन्म हा ||
मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा ||धृ ||
ती दिसली नाही कि,रश्मी अस्वस्थ व्हायचो. गावात तलाठी काकांकडे, बँकेत, साखर कारखान्यामध्ये, वाण सामान, कपडे, वस्तू, औषधे, शेतीवाडी ई. कितीतरी काम असत. सर्व कामकाज तीच करायची. तिला जमत नाही असं काम नव्हतचं मुळी. त्यामूळे सुट्टीमध्ये कधी बँकेत, कधी तालुक्याला, कधी गुळाच्या गुऱ्हाळात, कधी साखर कारखान्यात न्यायाची. बऱ्याचं गोष्टी तिच्या कडून शिकायला मिळाल्या.
रश्मीचं वैधव्यसदृश्य जीवन --
पण आपलं काय चुकलं? राजेश बरोबर आपला संसार या वळणावर का पोहोचला? पुन्हा प्रश्न तरंगला मनात. पण रश्मी आता सुख; दुःख; आनंद; हर्ष; खंत या साऱ्या भावनांच्या पार पुढे गेली होती. शरीर जरी यंत्रवत काम करत होतं तरी या साऱ्यां मध्ये दोन गोष्टी खऱ्या वाटत होत्या.....
एक "आईच प्रेम" आणि दुसरं "त्रिकालाबाधित सत्य ईश्वर". साऱ्या सृष्टीचा निर्माता, नियंता. मस्तक झुकवावं, लीन व्हावे अशी दोनच ठिकाणं आई आणि ईश्वर. सार स्वत्त्व विसरावं तर इथंच, प्रेम, कर्तव्य, माया, मोह, तुझं; माझं, मी पणा, सार इथं अर्पण. भावानांच्या पलीकडे होतं सारं. इथे ना चिंता; ना काळजी. ना तुझं ; ना माझं. ना स्त्री ; ना पुरुष. ना शक्तिवान; ना कमजोर. इथं फक्त भक्ती, निखळ प्रेम, इथं निर्मळ आनंद, मन भरून समाधान. तिची दृष्टी मूर्तीवर स्थिरावली होती. तिला भास झाला, सारी खोली प्रकाशमय झाली आहे. मंदस्मित चेहऱ्यावर पसरले. कित्तेक दिवसांनी ती मनापासून हसत होती. निर्मळ आनंदाची आभा
चेहऱ्यावर
पसरली. या जगामध्ये काय मिथ्या तिला माहीत नव्हते पण त्रिकालाबाधित असा ईश्वर सत्य आहे. निर्हेतुकपणे केलेलं प्रेम सत्य आहे. आईच प्रेम सत्य आहे, हाच संदेश मिळाला प्रार्थनेतून.
रविवारी साऱ्या ऑफिसची ट्रिप माथेरानला जाणार असल्याचं सांगून, राजेशने मेथी पराठ्याचं फर्मान सोडलं. कोणत्याही प्रकारचे भाव चेहऱ्यावर न ठेवता रश्मीने राजेशची बॅग आणि डबा भरून दिला. त्याला बाय करून रश्मी बेडवर पडली. तिचं मन निरपेक्ष झाले तरी कुसळ टोचल्यासारखा ठणका मनातून मस्तकात गेलाच. पण रश्मीने त्याचा बाऊ केला नाही. तिनं आता मनात विचार वाढवून दुःख करणं, अश्रू ढळणं कमी केल. दुःखाची तीव्रता कमी करण्याच बळ प्रार्थनेतून प्राप्त झालं होतं. रविवारची सर्व काम आटोपून ती बेडवर आडवी झाली. पण गेलं वर्षभर तिची झोप उडाली होती. जाणीवपूर्वक आपल्या मनातील विचार भरकटण्या पासून थोपवून धरण्याची सवय लावली स्वत:ला. तरी तिला आज आठवलंच....
राजेश आपल्या ऑफिसमधील नवी मुलगी फातिमा 😍 बरोबर हॉटेल रूमवर जाताना पाहिल्याचं आणि रोज फातिमाला आपल्या गाडी मधून 🚘 नेत असल्याचे कानी आलं. पायाखालची जमीन सरकली तिच्या. आकाश कोसळलं तिच्यावर. नवऱ्याचं बंधनविरहित वर्तन, प्रतारणा, विश्वासघात होता तो. संतापात होरपळलीय ती. कधी नव्हे तितकी आगतिक झाली. शारीरिक भूक 🔥 भागविणासाठी इतक्या हीन पातळीवर गेला. घरात न आलेल्या दागिन्यांचं बिल पाहिलं तेव्हा चक्रावलीच 😇 ती. म्हणजे शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामा
जिक सर्व प्रकारे घात केला.
प्रतारणेनं अंगाची आणि मनाची लाही लाही झाली तिची. आपण दोघे कधी ज्या हॉटेलमध्ये गेलोच नाही, त्या हॉटेलच्या बिलाबाबत हॉटेलवरून फोनद्वारे केलेली विचारणा, “काय होतं हे सार ?” ती रागातच राजेशची वाट पाहत होती.
रात्री दहा वाजता राजेश आला. लाल तरवटलेले 😳 डोळे, दारूचा🍺 भपका, दुर्गंध नाकात गेला तिच्या.
रश्मीचे लाल, सुजलेले डोळे आणि अवतार पाहून त्यानंच तिला प्रश्न केलं, ” कोण मेलं तुझं? “संतापाचा कडेलोट झाला रश्मीच्या.
रश्मीनं सारी आग ओकण्यासाठी तोंडातून राजेशच्या ऑफिसमधील नवीन मुलगी फातिमाचा उल्लेख केल्यावर त्याची नशा खाडकन उतरली. हद्द ओलांडली त्यानं. रागाने लाल झाला तो आणि रश्मीच्या गालावर वेगानं येणारा रजेशचा, हात वरच्या वरच पकडला रश्मीनं. त्याची मजल तिला सर्व कांही सांगुन गेली. पण पुढील शब्दानं घायाळ झाली ती कायमची, “तु गेलीस खड्यात. मला पाहिजे तसा वागेन”, असे म्हणून तो बेडरूम मध्ये निघून गेला.
घर असावे घरा सारखे….
उध्वस्त झालं सारं. जिवंतपणी न दाखवता येणरं वैधव्य होतं ते. फक्त तिलाच माहीत होतं की, नवरा जिवंत असून ती विधवा झाली होती. नवरा जिवंत असताना विधवा म्हणजे नरक यातना. पूर्ण वर्ष झालं सहन करतेय रश्मी.
बेडवर पडलेल्या रश्मीचा हात गालाकडे गेला झटकन. तिच्या मनावर आणि आणि हृदयावर झालेला
शारीरिक आघात…… त्याला काळ औषधं. मनाचं काय ?
जाणतेपणी इतकी शारीरिक होलपट, मनाची रक्तबंबाळ अवस्था पहिल्यांदाच भोगलं तिनं. आबा गेल्या नंतर सहानुभूतीपूर्ण वातावरणात वाढलेल्या रश्मीला; आईकडे भांडण, आरडाओरड, शिवीगाळ, हीन शब्द, हात उगारणे असे प्रकार पाहिले नव्हते. आईचं 🙄 मोठे डोळे करून पाहणचं शिस्त लावून गेलं होतं.
संतापाची जागा आगतिकता आणि असाहाय्यतेनं घेतली होती. लहान देविशाकडे पाहून सारं सहन केल तिनं.
दूर रहात असलेल्या सासू – सासऱ्यांच्या कानावर सदर बाब घालूनपण काही उपयोग झाला नाही. “मुंबईत हे सारं चालतच. राजाला नावं ठेवण्याऐवजी, तूच आपली मतं सुधारावीत”, अशी शिकवण मिळाली तिला. या वयात नव्या नीतिमत्तेचे बाळकडू आणि संस्कार सासू व सासऱ्यांच्या तोंडून ऐकून तिच्या चेहऱ्यावर कायमचं प्रश्न चिन्ह ❓️ उभ राहिलं. …. कधीच उत्तर नं मिळण्यासाठी.
आठवणीने जखमेवरची खपली निघाली, पण आज जखम भळभळली नाही. दरम्यानच्या काळात सासूचा अंत झाल्याने सासरे तिच्याकडेच राहायला आले होते. पण रश्मीच दुःख त्यांना कधीच जाणवलं नाही, ना राजेशला त्याचं वागण सुधारण्याबाबत काही सांगितलं. घर होतं जिवंत फक्त देविशामुळे. बाकी सारे व्यवहार होते. घरात घरपण कोठे होते❓️
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती,
तिथे असावी आपुलकी अन, जाणीवपूर्वक टिकविलेली नाती. 🏡 घराचं घरपण टिकावं म्हणून रश्मी धडपडत होती.
सप्तपदी दोघांनी मिळून चलली👣👫, निभावायची फक्त आपण. संसार दोघांनी मांडला, टिकवायचा आपण, वचन दोघांनी दिलं-घेतलं 👩❤️💋👨, निभावायला आपण स्वतः. देविशाला जन्म दोघांनी दिला👩👩👧. वाढवायचं आपण. संस्कार फक्त आपल्या वर झालेत.
तो फक्त वाढला, देहाने. चोचले पुरविले देहाचे, सगळंच देह भावासाठी. कारण दोघेही भिन्न परिस्थितीतुन आलेले. जीवनाच्या जाणीवा वेगळ्या, संस्कार वेगळे. संस्कार करणारे वेगळे. इथे दोष कुणा
चा?
2 Responses
संवेदनशील
आपल्या व्यक्त मता बद्दल मी आभारी आहे. धन्यवाद..