मळ्यात काम करणाऱ्या मरिआप्पाचा मूलागा, श्रीसंताने वाडीतून येताना एक लालसर रंगाचे कुत्र्याचे पिल्लू आणले. छोटसं पिल्लू पाहून आम्ही सर्वजण त्याच,”लाल्या” असं नाव ठेवलं. हणम्या व बंड्या बैल जोडी, कामधेनु गाय, मनी व सुंदरी मांजऱ्या आणी काळी कुत्री बरोबर लाल्या आमच्या कुटुंबाचा भाग बनला.
दूध भात , कुस्करलेली भाकरी खाता खाता तो मोठा कधी झाला समजलच नाही. ताठ आणि उभे कान, काजळ घातल्यासारखे डोळे, वाकडी शेपूट घेऊन
मळ्यात या टोका पासून त्या टोका पर्यत अस्सा काही रुबाबात फिरायचा, मालकच तो. आगोदर गुरsssगुरsss आणी नंतर जबडा पसरुन भुंकायला 🐶 लागला की कुण्या परक्या माणसाची हिमत नाही
मळ्यात
पाउल ठेवायची.
आसा हा लाल्या, त्याला परक्या माणसाची चाहुल लागली की धावत सूटायचा की समोरच्याची हालत होत आसे. पण मला आठवत नाही, त्याला कधी दोरखंडाने किंवा साखळीने बांधून ठेवल्याचे.
मनी आणि सुंदरी मात्र त्याला त्याच्या शत्रु वाटायच्या, कारण त्याचा दोघीचा अगदी स्वयंपाक घरातल्या चुली पर्यंत वावर केलेला सर्वांना चालायचा. आणि लाल्याला मात्र उंबरठया बाहेर ठेवले जायचे. गरम भाकर, चपाती झाली की पहिला मान लल्याचा असे.
एकदा काही मह्त्वाच्या कामांसाठी एका आठवडया साठी आई बाहेरगावी गेली होती. ह्या पठ्याने पूर्ण एक दिवस जेवणला तोंड लावले नाही. ताईआजीने दिलेली भाकर तिथेच खाण्याऐवजी दूर शेतात का घेऊन जातो ? याच कोडं उलगडेना. तिसऱ्या दिवशी त्याला भाकर दिली व आम्ही लाल्याचा पाठलाग केला. पाहते तर काय? लाल्याने आपल्या नखाने खड्डा बनवून त्यात भाकार ठेवली आणी वरून माती ओढून भाकर लपवली. ताईआजीला वाटलं लाल्याच पोट बिघड्लय. पण दिवसेंदिवस तो मलूल दिसायला लागला. हालचालीतला चपळपणा कमी झाला. त्याला दूध -भात देऊन पाहिला. पण फक्त्त हुँगायचा अजीबात खायचा नाही.
लाल्या आमच्या घरातला मेंबर होता. तीन दिवस झाले , घरी आई नसल्याने आम्ही तीघी बहिणी आणी ताई आजी नीरुत्सही होतो. चौथ्या दिवशी आम्ही तीघी जेव्हा शाळेतुन घारी आलो तेव्हा लाल्याने थंडपणे स्वागत केले.
पण आचानक त्याने कान टवकारले, डोळ्यात वेगळी चमक दिसली, आणी…..
पटकन जागेवर उभा राहिला…… कानात वार शिरल्या सारखा जो काही धावत सुटलाsss आम्ही लाल्या, लाल्या हाका मारतोय, तो पर्यंत त्याने शेताची हद्द गाठली आणी आईला पाहून इतका खुष झाला की बस…..! आमच्या आगोदर तिथेच आईने त्याच्या डोक्यावरुन, पाठीवरून हात फिरवला, त्याच्याशी गप्पा ठोकल्या, पठ्याच काही समाधान होत नव्हते. जीभ बाहेर काढुन जोरजोरात श्वास घेत होता, कमरे पासून शेपटी पर्यंतचा भाग जोरात वारंवार हालवून आनंद व्यक्त करत होता.. आम्ही तीघी बहिणी, आई जवळ पोहोचलो… 💁🏻💁🏻💁🏻 मधली बहीण चंदाने आईला, लाल्याच्या उपवासाबद्दल सांगितले आणी छोटी सई आईला बीलगली…
घरी आल्यावर आईने प्रथम हात पाय धुवून , लाल्याला दूध -भात, भाकर दिली . जेवणावर मस्तपैकी ताव मारून लाल्याची स्वारी मळ्यात फेरफटका मारायला निघाली.
बऱ्याच दिवसानंतर आई आणी मी संध्याकळी मळयात फेरफटका मारायला निघालो. नारळ सुपारीची बाग, ऊस, तम्बाकु, भुईमूग शेंगा शेती मागे टाकत आम्बा, चीक्कु, शिताफल, पपया, पेरू चिंच, अवळ्याने लगडलेलि झाड़े पाहत पाहत, गुलाबाचे काळया व फुल लगडलेले झाड, लाल, गुलाबी पिवळी आणी पांढरी जास्वंदी, तसेच पिवळी, गुलाबी, केसरी
संकेस्वरची लाम्ब देठाचि फुले, मंद सुगंधी पसरवणारिव पांढऱ्या गुलाब फुलांचl वेल पाहून मन गुणगुणायला लागल. मधेच शीळ वाजवणारl वारा , त्या बरोबर येणारा भातशेतीचा धुंद करणारl व भूक वाढवणंlरा गंध, आणी पाटातूुन झुळझुळ वाहणारे स्वच्छ पाणी सुंदर वातवरण
झाडाला लागलेल्या लाम्बसड़क लाल हिरव्या मिरच्या आणी कोवळी लुसलुसीत कोथीम्बिरिचा वास दरवळला.
रात्रीच्या जेवणात हिरव्यl मीरच्याची चटणी करूया आई म्हणाली, विचार करून आई एका मीरचीच्या झाड़ा जवळ झुकली, एकाच देठाला तीन मिरच्या एक हिरवीगार ,दूसरी हिरवट लालसर तर तीसरी लाल भडक ….. निसर्गातील विविधता मनात साठवत होतो.
मी आईला 7/8हिरव्या मिरच्या दिल्या धावत धावत आलेला लाल्या आईच्या हातात काहितरी ठेऊ पहात होता…… आम्ही पाहिल तोंडात मिरच्या ? मालकिणिला मिरच्या तोडण्यासाठी मदत करतोय लाल्या….. “शी घाण, तो दात घासत नाही, चुळ भलत नाही.. नको नको आम्हांला तु तोंडातुन आणलेल्या मीलच्यl नको. आई, संlग ना त्याला, कलतच नाही ऊस्थ द्यायच नाही ते,” दुडू दुडू धावत आलेली सई लाल्याला हाकलून लावत होती आणी कूत्तू महाशय मदत करायचे सोडायला तयार नव्हते.
आपल्या मलकिणिवर नितांत, नीर्व्याज,नीर्हेतुक प्रेम करणारा मुका प्राणी तो.
एकदा रात्रीच्या वेळी धपकन काहीतरी पडल्याचा आवज झाला म्हणून मी आणी आई बॅटरी घेऊन जवळपास राउंड मारला. लाल्या तिथेच नारळाच्या झाडा ख़ाली बसून वर पाहताना दिसला. आम्ही लाल्याला हाक मारून घरी येऊन झोपी गेलो. सकाळचे सात वाजले तरी लाल्या न्याहारी साठी आला नाही म्हणून जोर जोरात हाका मारतोय आम्ही झाडा खालूनच हाकेला भोsss भोsss उत्तर आल. शेवटी आईने बाहेर येउन हाक मारली. धावत येउन तिचा पदर दाता मध्ये धरून तिला खेचतोय. “अरे थांब. आले,” म्हणत आई त्यच्या बरोबर गेली तर झाडाच्या शेन्ड्या कडे बघून जोर जोरात भुंकतोय. झाड़ा वरून वरून पुरूषी पण रडवा आवज ऐकून आई पाहते तर काय ? यल्ल्या, भुरटा चोर झाडावर…. “वहिनीसाब, मला लाल्यापासून वाचवा हो. काल रात्री पासून आडकलोय झाडावर. लाल्यl काय जागचा हालेना, मला काय पळता येईना.” लाल्याला बाजूला जायला सांगून आईने यलापाला चार चांगल्या गोष्टी सांगितल्या आणी दोन नारळ पण दिले. लाल्याला शाबासकी म्हणून मायेचा हात डोक्यावरुन फिरवला, खुश होऊन लाल्या शेतात हूंदडायला गेला.
आपल्य्l मालकावर आणी त्यांच्या मुलांवर नितांत प्रेम कराव आणि ते दाखवावे तर लाल्यानेच. आणी त्याची पद्दत पण वेगळी
आणाकाकाची लोचन माझ्या हून एक वर्षानी मोठी. सुंदर, पाणिदार, मोठे आणी बोलके डोळे. अतिशय हुशार आणि बडबड करणारी काकू, काकु म्हणून माझ्या आईच्या सतत मागे पुढे राहून शाळेतल्या, गुरु जी च्या आणी मैत्रिणिच्या गमती सांगत असे, अगदी हावभाव करून. आम्हाला तिचा आधार वाटत असे. लोचन सुटीच्या दिवशी मळ्यात फेरफटका मारायला आली. दुरुन लागला सुगावा लाल्याला. जागेवरुन उठला, शरीर झटकले, कान टवकारले, कमरे पासून शेपटी हालवत, वारा पिऊन स्वारीने धूम ठोकली… मोठा जबडा उघडून, गुलाबी जीभ बाहेर काढून, जोरजोरात तोंडाने श्वास घेत आपल्या दिशिने लाल्या येतोय ते बघून घाबरुन काय करावे सुचेना लोचनला. जीवाच्या आकांताने, ” काकू मला वाचव ” अस म्हणून तोंडावर हात मारून जोरजोरात ओरडत बो बो करून बोम्बलायला लागली. लाल्याचा उत्साह वाढ्ला. लोचन आपल्याला घाबरून बोम्बलते आहे हे त्याच्या गावीही नव्हते. फक्त आपल्या पद्दतींने स्वागत करणे एव्हडेच माहित होते त्याला. मी आणी आई तिला सांगतोय घाबरू नको. आणि लाल्याला पाठी बोलावतोय . शेवटी लोचन तिथं खाली बसली आणि डोळे घट्ट मिटून घेतले, तसा लाल्याचा धावण्याचा वेग कमी झाला. लोचनला हुंगल्यानंतर लाल्याच समाधान झालं. आलेल्या माणसाची दाखल घेतली हेच दाखवायचं होत जणू मग मात्र परतला लाल्या. आमच बालपण अनुभवाने समृद होत.
वयोमाना प्रमाण लाल्याने वयाच्या तेराव्या वर्षी शांतपणे डोळे झकले. आम्ही लाल्याच्या करामती कधीच विसरू शकणार नाही. जगातून देह ठेवला पण आमच्या मनात तसाच आहे जसा आम्ही पहिला , प्रचंड उत्साह ओसंडून वाहणारा, कान टवकरून, वारा पिऊन धाव घ्यायच्या तयारीत असलेला आमचा लाल्या…
इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time
कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems
नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to
मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇
Artwork by VRatwork
Follow on Social Media:
10 Responses
Heart touching story .
माझी कथा वाचून अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद 👏🏻
Very nice and heart touching story I feel as if Iam living the story while reading
तुम्ही दिलेल्या अभिप्राय पुढील साहित्यिक वाटचालीसाठी प्रेरणा देईल. 🙏
खूप सुंदर आणि हार्दिक शुभेच्छा
तुम्ही दिलेल्या अभिप्राय पुढील साहित्यिक वाटचालीसाठी प्रेरणा देतील. धन्यवाद.
🙏
Thanks for your comments vijay ji . Your wishes means a lot for me.
Lovely ma’am
Hearty congratulations
I deeply appreciate all the support and encouragement I have received. Thank you!
🙏
Thank you Kausar Sayed sir ji. 👏