मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇
“आवो म्हारा गुजरात मा”,…. अशी महानायक श्री अमिताभ बच्चन यांनी दिलेली हाक ऐकून वाटायचे चला गुजरातलां निघुया . दयानंदना त्यांचे मित्र श्री संजय कुलकर्णी यांनी दिलेल्या श्री. प्रमोद केणे काकांचे , “दिव्यात्वाची जेथे प्रचिती” हे पुस्तक पुष्प वाचले . त्यातील काही प्रकरणांची पारायणे केली . परंतु दत्त पादुका दर्शनासाठी इतकी बिकट वाट मनाला रुचत नव्हती . सर्व खेळ मनाचे . शरीर साथ देईल का ? हा प्रश्न मनात आला . प्रत्यक्षात असे प्रश्न यायला नकोत . जेथे ओढ असते तेथे मन खोड काढत नाही . जिथे मन ठरवते की एखादी गोष्ट करायची तर शरीर साथ देते . पण वाटले की , नरसोबा वाडीला ( कोल्हापूर जवळ) जाऊन श्री दत्तचरणाचे दर्शन घेतले की, मन प्रसन्न आणि तन ऊर्जा घेऊन परतत असे . वाडीचा प्रवास सुरू झाला की, मन केव्हाच पोहोचलेलं असायच प्रवेशद्वारा पाशी . एक एक पाऊल पुढे टाकताना पेढ्यांच, अगरबती – कापूरचा सुगंध , नारळाचा ढीग , औदुंबर वृक्ष, कुंकू- हळदीचे ढीग सार मनचक्षू समोर दृश्य उभ राहात असे. कृष्णा नदीत हस्थ, पाय प्रक्षालान करून एक एक पायरी चाडून दत्त पादुकांचे दर्शन घेत असे . स्वामी आत्मबोधlनंद सरस्वती या गुरूंनी सांगितलेल्या मानसपूजे द्वारे कित्तेक वेळेस मनानेच वाडीला जात असते मी 👣. ध्यानी , मनी , स्वप्नी, “श्री गुरुदेव दत्त”, असे नामस्मरण ओघानेच येते .
परंतु आता गिरनारवरील पादुका दर्शनाची ओढ लागली . गुजरातला भेट देण्याची संधी मिळाली . फक्त 5, म्हणजेच अगदीच मर्यादित दिवसांसाठी पण अमर्याद उत्साह 💃💃 घेऊन आम्ही 12 लोक निघालो. 17 ते 62 वयोगटातील लोकांचा समूह . साने दाम्पत्य , रेश्मा आणि प्रशांत कुटुंबिय, आणि इतरांबरोबर निघालो आम्ही. कोणी नोकरीवाले तर कोणी व्यवसायवाले एक तर चक्क विद्यार्थी … .. . अर्चितच्या युवा-ऊर्जा शक्तीला सलाम .. आमचे लीडर श्री दिनेश हे माझ्या नावऱ्यlचे मित्र … खास नियोजन करून सर्वांशी सुसंवाद साधत होते . वैभवी व दिनेश हे आम्हा सर्वांना वेगवेगळी माहिती देत, आमचा उत्साह वाढवत , ज्ञानात भर टाकत होते . परिक्रमेत एणाऱ्या महत्त्वाच्या टप्यांबाबत , माहिती घेऊन मनाची तयारी झाली …..
आता वेळ आली प्रत्यक्ष परिक्रमेची . पायात स्पोर्ट्स शुज, गुडग्याना टोप्या (नी क्याप ), हातात बांबूची काठी व विजेरी घेऊन नर्मदे हर हर, जय गिरनारी जयजयघोषात , ओम श्री गुरु देव दत्त 👏 अशा नामस्मरणात आम्ही १२ जण दि. ७ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.४५ वाजता चालू लागलो. (काही लोकांकडून अकारण मिळालेली नकारात्मक ऊर्जा दूर फेकली ज्यांच्या मते परिक्रमा खूप अवघड असते आणि मनाचे खच्चीकरण करणारी माहिती देतात काही लोक. ) पूर्ण मनाची तयारी झाली होतीच पण थोडे टेनशन घेवून . देवाचे नामस्मरण, नैतिक धैर्य वाढवत होते. देव मनात , देव तनात , देव श्वासात , देव आसमंतात आणि ओढ परिक्रमा पूर्ण करण्याची जशी माणसांची नदी 🏃🏽♀🏃🏽♀🏃🏽♀🏃🏼🏃🏼🏃🏼 एका तालात वाहत होती .. डोंगर चढ – उतार , अगदीच निमुळता रस्ता, काही ठिकाणी खडकाळ रस्ता तर काही ठिकाणी चांगली पायवाट , काही ठिकाणी पावसामुळे अद्याप रस्त्यावर छोटे छोटे झरे वाहत होते. प्रथम बूट व सौक्स भिजले म्हणून थोडी हिरमुसले 😢.पण त्यामुळे पाऊलlना कोणताही त्रास झाला नाही . एका ठिकाणी शेकोटी 🔥पाहून बैठक ठोकली आणि गरमागरम चहा 🍵, बिस्कीट , कचोरी , गोड वाड्यावर ताव मारत असताना काही जण सोबतच्या काठीवर ➖➖➖➖🧦 सॉक्स टाकून शेकोटीवर सुकाविले … आणि पुढील परक्रमा सुरू झाली . कधी लिंबू सोडा 🍋, सरबत , नारळपाणी आणि सोबतचे इलेक्ट्रॉलचे पाणी पित- पित , काली मातेचे 👏दर्शन घेतले .
शिव मंदिराजवळ नागा साधू मोठ्या प्रमाणात होते . आम्ही ग्रुपने एकत्र पुढे निघालो …
तीनही डोंगर चढ उतार पूर्ण केले . आता रस्ता सरळ होता . आमच्यापैकी काहींनी वाफाळलेला ढोकळयाचा, उसाचा रस ई. आस्वाद घेत विश्रांती घेतली . छोटा अर्चीत परिक्रमा सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच बसला होता.
आणि आता शेवटचा टप्पा सुरू झाला . बोरदेवीचा टर्न सोडून आम्ही आता चालत चालत बाहेर पडण्याचा रस्ता पकडून संध्याकाळी 5 वाजता बाहेर आलो आणि हॉटेल वर येवून श्री गुरुदेव दत्त म्हणून निद्रादेवीच्या स्वाधीन झालो . आणि अशातऱ्हेने आमची गिरनार परिक्रमा पूर्ण झाली. जय गिरनारी ! जय गिरनारी ! नर्मदा हर!👏👏
इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time
कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems
नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to
मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇
Artwork by VRatwork
Follow on Social Media: